⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | धक्कादायक! मंडळाधिकार्‍यांच्या वाहनाला डंपरने उडवण्याचा प्रयत्न

धक्कादायक! मंडळाधिकार्‍यांच्या वाहनाला डंपरने उडवण्याचा प्रयत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । फैजपूर येथील मंडळाधिकार्‍यांच्या वाहनाला डंपरने उडवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडीच आला आहे. या प्रकणारी यावल पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपूर येथील मंडळाधिकारी एम.एच.तडवी (वय 53) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी ते मुलगा बिलाल तडवीसह फैजपूर येथून काम आटोपून सावखेडासीम येथे चारचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.झेड. 6423) व्दारे जात होते. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास विरावली गावापुढे कब्रस्तानच्या अलीकडे दहिगावकडून भरधाव वेगाने येत असलेला डंपरने मंडळाधिकार्‍यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर धडक दिली. यावेळी बचावासाठी वाहन रस्त्याच्या कडेला उतरवण्यात आले तर डंपर चालक वाहनासह पसार झाला. या अपघातात वाहनाचे 25 हजारांचे नुकसान झाले. मंडळाधिकारी तडवी यांच्या आरोपानुसार जीवे ठार मारण्याचा उद्देशाने हा अपघात फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू मुरलीधर राणे याने घडवून आणला. अधिक तपास प्रभारी अधिकारी आशीत कांबळे करीत आहे.

आरोप तथ्यहीन
माझा रेतीचा व्यवसाय नाही वा माझ्याकडे डंपरदेखील नाही मात्र असे असताना मंडळाधिकार्‍यांनी आपल्यावर केलेले आरोप निरर्थक व हास्यास्पद आहेत. मंडळाधिकारी कार्यालयात थांबत नसल्याने दोन दिवस आपण त्यांच्या अनुपस्थितीतबाबत फेसबुकवर लाईव्ह माहिती दाखवली व त्यामुळे व्यथीत होवून त्यांनी आपल्यावर आरोप केला आहे. कुठल्याही वाळू वाहतूकदाराशीदेखील आपला काडीमात्र संबंध नाही, चौकशीला सामोरे जावू, सत्य समोर निश्चित येईल, असेही राणे म्हणाले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह