⁠ 
सोमवार, जून 17, 2024

उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्वल निकम आघाडीवर की पिछाडीवर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । जळगावचे असलेले प्रसिद्ध वकिल उज्वल निकम यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने उज्ज्वल निकाल यांना उमेदवारी दिली. येथून उज्ज्वल निकाल आणि वर्षा गायकवाड यांच्यात सामना आहे. यावेळी उत्तर मध्य मुंबईत५१.९८ टक्के मतदान झालं.

दरम्यान आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यात उत्तर मध्य मुंबईमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उज्वल निकम 11288 मतांनी आघाडीवर आहे. तर वर्षा गायकवाड पिछाडीवर आहे.