जळगाव जिल्हामहाराष्ट्र
मुंडे आणि खडसेंमध्ये झाल्या ‘नॉन पॉलिटिकल’ गप्पा !
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । गेल्या काही तासांपासून बहुचर्चित असलेली भेट अखेर झालीच. आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. बंद दाराआड त्यांची भेट झाली.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना एकनाथ खडसे यांनी बोलताना आजच्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे.
मी कोणत्याही राजकीय नेत्याला बोलावलं नाही. इथं आलेला प्रत्येक जण मुंडे साहेबांच्या प्रेमासाठी आला आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात यावेळी त्यांनी भेटवर आणि झालेल्या चर्चेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.