⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | सीआयएससीई बोर्डच्या 10वीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

सीआयएससीई बोर्डच्या 10वीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२४ । दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १० वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. अनुभूती स्कूलमधून आदित्य सिंग हा ९५.४० टक्के गुणांसह प्रथम आला. त्याला गणित याविषयात ९९ गुण प्राप्त झाले. तर इतिहास-भुगोलमध्ये ९७, विज्ञान ९६, इंग्रजी ९०, हिंदी ९५, कला ९० गुण मिळाले. केवल अमित सेवला हा विद्यार्थी ९४ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक, उत्तरा बरंठ ही विद्यार्थीनी ९२.८० टक्क्यांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.

अनुभूती निवासी स्कूलमधून ४२ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालामध्ये ९० टक्क्यांच्यावर पाच विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले तर ८० टक्क्यांच्यावर ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विषयानुसार ९० गुणांच्यावर ४४ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. संपूर्ण भारतातून आयसीएसई शाळांध्ये अनुभूती स्कूलने आपला ठसा उमटविला आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई पॅटर्नची कान्हदेशातील पहिलीच शाळा आहे. सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी विद्यार्थ्यांवर शाळेत पाचवी पासूनच विशेष लक्ष दिले जाते. अनुभूती स्कूलमधून उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासह, उद्योजक व उच्च पदांवर आपला सुयश संपादन केले आहे. हे अनुभूती स्कूलच्या यशाचे गमक असून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे. वर्षभर शिक्षक व शिक्षकतेतर सहकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले. अनुभूती स्कूलच्या संचालक मंडळातील श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन, सौ. निशा अनिल जैन, देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

‘निसर्गाच्या सान्निध्यात विस्तारलेली अनुभूती स्कूल इयत्ता ५ वी ते १२ पर्यंत पूर्ण निवासी आहे. अनुभूतीमध्ये औपचारिक शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. ज्यामुळे स्पर्धात्मक जगात अनुभूतीचे विद्यार्थी आपली वेगळी छाप सोडत आहे. स्कूलमध्ये १७ वेगवेगळ्या राज्यातून विविध संस्कृतीचे विद्यार्थी व शिक्षक असल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन इथं घडते. प्रत्येक सात विद्यार्थांमागे एक शिक्षक असे उत्कृष्ट प्रमाण असल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता उच्चतम राखली आहे. शिक्षकांनी घेतलेली मेहनत, अनुभवाधारित शिक्षणासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करुन देणारे व्यवस्थापन यामुळेच यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखता आली.’
सौ. निशा अनिल जैन,
संचालिका, अनुभूती निवासी स्कूल

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.