⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Remote Control Government : भाजपात कोणाकडेही ‘रिमोट कंट्रोल’ राहू शकत नाही?

जळगाव लाईव्ह न्यूज । Remote Control Government ।  मुंबई- सुरत- गुहाटी- गोवा गेल्या आठवडाभरात तब्बल चार राज्यत फिरलेले महाराष्ट्र राज्याचे तिसावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी झाला. शिंदेच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी मी कोणत्याही पदावर नसेल अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे अनेकांना धक्का बसला. ज्या प्रकारे बाळासाहेबांनी १९९५ साली मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं आणि सरकारचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवला त्याच प्रकारच काम आता देवेंद्र फडणवीस करतात की काय? असा प्रश्न कित्येकांना पडला. मात्र फडणवीस यांनीउपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये रिमोट कंट्रोल सिस्टीम चालत नाही हे सिद्ध झाले.व भाजपातला अंतर्गत वाद समोर आला.

एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज महाराष्ट्राच्या ३०व्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. याच बरोबर फडणवीस यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर भाजप आणि एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करण्याच्या तयारीत होता. एकनाथ शिंदे दुपारी मुंबईत दाखल झाले. शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली त्यानंतर सायंकाळीच ७.३० वाजता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली.

स्वतःच्या पक्षाकडे सत्ता असूनही मुख्यमंत्रीपद न घेणारे उदाहरण याआधी महाराष्ट्रामध्ये एकदाच पाहायला मिळाले ते होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्या नंतर अशाच प्रकारची खेळी आता देवेंद्र फडणवीस खेळतात की काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र लगेचच जेपी नड्डा यांच्या सुचने नुसार फडणवीसांनी उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी झालेल्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मी कोणत्याही मंत्रीपदावर राहणार नाही. मात्र बाहेरून माझं या सरकार कडे लक्ष असेल, ते सरकार नीट काम करत आहे की नाही ? याकडे मी लक्ष ठेवेल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.