⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

काहीही झालं तरी उद्धव साहेब राजीमाना देऊ नका : मंत्रिमंडळाची ठाकरेंकडे मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । काहीही झालं तरी उद्धव साहेब राजीमाना देऊ नका अशी मागणी मंत्रिमंडळानी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. एकनाथ शिंदे आणि केलेल्या बंडामुळे राज्यात सत्ताउलथापालथीचा हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाकडून बच्चू कडू यांच्यासह 10 आमदारांना मुंबईत पाठवलं जाणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बैठकांवर बैठका घेत असून दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.अशातच उद्धव ठाकरे घेतील तोच अंतिम निर्णय असणार असते असा निर्धार राज्य मंडळाने घेतला आहे. आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात अली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले होते.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी सर्व मंत्र्यांनी दाखवली. उद्धव ठाकरे जी भूमिका मांडतील ती मान्य असेल अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. तुम्ही जी भूमिका घ्याल ती मान्य असेल असे मंत्र्यांनी ठाकरेंना सांगितली. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री राजीनामा देतील अशी चर्चा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी असे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना कले

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु असतानाच आता सरकार बहुमत चाचणीला सामोरं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्व पक्षीय नेते, मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सांगण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचंही या बैठकीत ठरलं.