जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण
कोणताही गुन्हा हा खोटा दाखल होत नसतो – मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । जळगाव. खोटा गुन्हा दाखल करून आपल्याला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की ‘कोणताही गुन्हा हा खोटा दाखल होत नसतो. अन्याय होत असेल तर एकनाथ खडसे यांनी कोर्टात जावं’,
एकनाथ खडसे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, की ‘कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात. जे होत आहे ते पाहावं. अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिलं आहे.
याच बरोबर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकि संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्षाचा आहे. असेही ते म्हणाले आहे.