नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आलीय. नवी मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) ६२० पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. जाहिरातीनुसार गट’क’ व गट ‘ड’ मधील विविध संवर्गातील पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे. NMMC Recruitment 2025

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात उद्या २८ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२५ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांना www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. नवी मुंबई महापालिका भरती प्रक्रिया जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत.
कोणत्या पदांसाठी भरती अन् पगार किती?
बायोमेडिकल इंजिनियर पदासाठी भरती आहे. या पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर सिविल इंजिनियर, ज्युनियर बयोमेडिकल इंजिनियर, उद्यान अक्षिक्षक, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवर या पदांसाठी ३८६००-१२८०० रुपये पगार मिळणार आहे.
डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तज्ञ, सी.एस.एस.डी तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ या पदासाठी ५४०० ते ११२४०० पगार मिळणार आहे.
नेत्र चिकीत्सक सहाय्यक पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. आरोग्य सहाय्यक महिला, औषध निर्माण अधिकारी या पदांसाठी २९२००-९२३०० रुपये गार मिळणार आहेय याचसोबत उद्यान सहाय्यक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे.
शुल्क : या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरायचे आहेत.