मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

रुशील प्रवीण चौधरी याचे निधन

जळगाव – शहरातील आराधना कॉलनीतील रहिवासी असलेल्या रुशील प्रवीण चौधरी वय – २१ यांचे सोमवार दि.१७ रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ११ वाजता मू.जे.महाविद्यालय मागील घरून निघणार आहे. नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. रुशील हा कॉम्प्युटर बीमचे संचालक संजय चौधरी, किशोर चौधरी यांचा पुतण्या तसेच उडान दिव्यांग फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांचा मुलगा होता. त्यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकू, आत्या, मामा, भाऊ, भावंडे असा परिवार आहे.