जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल ५०० जागांसाठी भरती जाहीर झालीय. एनआयसीएलने या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली आहे.
या भरती प्रक्रियेला २४ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. यासाठी तुम्हाला nationalinsurance.nic.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.
पदाचे नाव : असिस्टंट (क्लास III)
भरतीसाठी पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. तसेच उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करणार आहे त्या राज्याची स्थानिक भाषा त्या उमेदवाराला येणे गरजेचे आहे.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/ExSM: ₹100/-]
पगार : रुपये 22405-1305(1)-23710-1425(2)-26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)-49765-2500(5)-62265.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रीलियम्स, मेन्स परीक्षा आणि रिजनल टेस्टद्वारे केली जाणार आहे. यासाठी फेज १ परीक्षा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे तर असिस्टंट फेज २ परीक्षा २८ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा