⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | नोकरीची संधी! NHM जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

नोकरीची संधी! NHM जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. NHM Jalgaon Bharti 2024

या भरती मार्फत एकूण 67 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने राबविली जात आहे, याची अर्जदारांनीं नोंद घ्यावी .

ही पदे भरली जाणार?
राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत “डीईआयसी व्यवस्थापक, क्यूए समन्वयक, जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम, सुविधा व्यवस्थापक -ई -एचएमआयएस, एमओ -आयुष पीजी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एमबीबीएस / बीएएमएस” पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . यासाठी तुम्हाला मूळ जाहिरात वाचावी लागेल.
परीक्षा शुल्क :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १५०/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१००/-

नोकरी ठिकाण – जळगाव
वयाची अट : ३८ ते ४३ वर्षे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.