बातम्याराष्ट्रीयवाणिज्य

१ जानेवारीपासून अनेक नवे नियम लागू होणार; जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन वर्षाच्या आगमनासोबत अनेक नवे नियम लागू होणार आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात महत्वपूर्ण बदल होणार आहेत. १ जानेवारी २०२५ पासून नवीन नियम लागू होणार या नवीन नियमांमुळे एलपीजी गॅस सिलिंडरपासून ते यूपीआय पेमेंट पर्यंत, सर्व क्षेत्रात फरक दिसून येईल.

एलपीजी गॅसच्या किंमती
दर महिन्याला १ तारखेला ऑइल कंपन्या घरगुती आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीवर संशोधन करते आणि नवीन किंमती जाहीर करतात. नवीन वर्षात या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू शकते.

EPFO चे नियम
कर्मचारी भविष्य निधी योजनेतील नियमात महत्वपूर्ण बदल होणार आहेत. आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकतात, ज्यामुळे पेन्शन निकालन्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या बदलामुळे पेन्शनर्सचे जीवन सोपे होणार आहे.

UPI 123 Pay चे नियम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑनलाइन पेमेंटबाबत नियम बदलले आहेत. UPI 123 Pay च्या माध्यमातून आता युजर्स १०,००० रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करू शकतात. ही सुविधा विशेषतः फीचर फोन वापरणार्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

शेतकऱ्यांचे लोन
शेतकऱ्यांना दिले जाणारे लोनबाबतही बदल करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत लोन कोणत्याही गॅरंटशिवाय मिळणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

इतर महत्वपूर्ण बदल
UPI Lite वॉलेटची लिमिट ५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे छोटे-मोटे लेनदेन सोपे होतील. ऑटो टॉप-अप सुविधेमुळे UPI Lite वॉलेट स्वतःच टॉप-अप होईल. आधार आधारित ओटीपी सुरक्षा सुविधा देखील लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे डिजिटल लेनदेनात सुरक्षा वाढेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button