⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खान्देशवासियांसाठी खुशखबर : सूरत आणि नंदुरबारसाठी विशेष अनारक्षित रेल्वे सुरु करण्याचा निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबारसाठी विशेष अनारक्षित रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे खान्देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबार विशेष रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाडीचे परिचालन सुरु करण्यात आले होते. मात्र याच क्रमामध्ये रेल्वे प्रशासन द्वारा यात्री सुविधे करिता पुढील सूचना मिळेपर्यंत आरक्षित विशेष गाडीच्या बदल्यात अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

गाडी क्रमांक -09077 / 09078 अप डाऊन भुसावळ-सूरत आणि गाडी क्रमांक -09007 /09008 अप डाऊन  भुसावळ-नंदुरबार , ज्यामध्ये केवळ सामान्य श्रेणीचे डबे अनारक्षित मानले जातील. गाड़ी क्रमांक-09077/09078 भुसावळ ते  सुरत करीता  मेल एक्सप्रेस चे  भाडे (किराया ) राहील आणि  गाड़ी क्रमांक – 09007/09008  भुसावळ -नंदुरबार करीता  पॅसेंजर भाडे  (किराया) लागू राहील .

गाड़ी क्रमांक-09077/09078 अप/डाउन  भुसावल-सूरत और गाड़ी क्रमांक – 09007/09008 अप/डाउन  भुसावळ-नंदुरबार मध्ये  स्लीपर क्लासचे ३ कोच  आरक्षित असतील व उर्वरित कोच अनारक्षित असतील.

 

सध्या या गाड्यांसाठीच अनारक्षित  तिकिटे दिली जातील, या गाड्या वगळता इतर कोणत्याही गाड्यांसाठी अनारक्षित तिकिटे दिली जाणार नाहीत. सर्व प्रवाशांनी नेहमीच  सामाजिक अंतर सुनिश्चित केले पाहिजे, मास्क  घालावे आणि कोविड १९  च्या निर्धारित नियमांचे पालन  करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .