जळगाव शहरभुसावळ

तिरूपती बालाजीच्या भक्तांसाठी गुडन्यूज ! जळगाव-भुसावळमार्गे धावणार तिरुपती-हिसार नवीन ट्रेन

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२५ । तिरूपती बालाजी हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून तिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त दर्शनासाठी येत असतात. जळगाव भुसावळ मार्गे तिरुपती बालाजीला जाण्यासाठी मोजक्यात दोन तीन रेल्वे गाड्या धावत आहे. मात्र अशातच रेल्वे प्रशासनाने तिरुपती ते हिसारदरम्यान नवीन साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे..

ही गाडी एकूण २४ फेऱ्यांसाठी नियोजित करण्यात आली आहे. ही गाडी तिरुपती-हिसार-तिरुपती मार्गावर धावणार आहे. विशेष या ट्रेनला भुसावळसह जळगावला थांबा आहे. त्यामुळे आता बालाजींच्या दर्शनासाठी तिरुपतीला जाण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची सोय झाली आहे.

गाडी क्र. ०७७१७ ही विशेष गाडी ९ जुलै ते २४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रत्येक बुधवारी रात्री ११.४५ वाजता तिरुपतीहून सुटेल व शनिवारी दुपारी २.०५ वाजता हिसारला पोहोचेल. गाडी क्र. ०७७१८ ही विशेष गाडी १३ जुलै ते २८ सप्टेबर २०२५ या कालावधीत प्रत्येक रविवारी रात्री ११.१५ वाजता हिसारहून सुटेल व बुधवारी सकाळी ११.३० वाजता तिरुपतीला पोहोचेल. ही ट्रेन

या स्थानकांवर असेल थांबा?

या विशेष गाडीला रेनिगुंटा, रामपेट, कड्डूपा, येर्रगुंटला, ताडीपत्री, गुत्ती, गुंटकळ, धोन, कुर्नूल सिटी, गदवाल, महबूबनगर, जडचर्ला, काचीगुडा, मलकाजगिरी, मेडचल, कमारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मन्दसौर, नीमच, चित्तौडगड, भीलवाडा, बिजैनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा जं, रिंगस जं, सीकर जं, नवालगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू आणि सादुलपूर आदी स्थानकांवर थांबे आहेत.

एकूण २२ डब्यांच्या या रेल्वेमुळे दक्षिण भारतातील तिरुपतीसारख्या तीर्थक्षेत्रापासून हरियाणातील हिसारपर्यतचा प्रवास आता अधिक आता अधिक सुलभ आणि आरामदायक होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button