यापुढे आता 10वीच्या वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द.. जाणून घ्या नवीन शैक्षणिक धोरणात काय बदल झाले??

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२२ । शासनाने शिक्षण विषयक नवीन धोरण जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणेनुसार 10 वी च्या बोर्डाच्या परिक्षेत बदल करण्यात येत आहे. यापुढे आता 10 वीचा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द करण्यात आला आहे. तर यापुढे आत 12 वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून असणार आहे. त्यामुळे आता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी परीक्षा ही बोर्डाची नसेल.

दहावी बोर्ड रद्द करून अकरावी बोर्डाची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती; मात्र आता ती बदलून बारावी बोर्ड परीक्षा करण्यात येणार आहे. परंतु, पदवीच्या वर्षामध्ये पहिल्या वर्षी प्रमाणपत्र परीक्षा होणार असल्याचेही एका बाजूला जाहीर करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला बोर्ड परीक्षा होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमके काय होणार? हा संभ्रम आहे.

तर 10 व्या वर्गात शिक्षण घेत असणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा बोर्ड मध्ये होणार नाही. तसेच पदवी 4 वर्षांनंतर केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग 11 वी राहणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार नाही.10 वी च्या वर्गाची बोर्डची परीक्षा रद्द करून 11 वी ची बोर्डची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती. परंतू त्या मध्ये नवीन बदल करून 12 वी ची परीक्षा बोर्ड मध्ये होणार आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षात लागु होणार्‍या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिला टप्प्यात 1ली ते 5 वी चा पूर्व प्राथमिकचा टप्प्या असेल. त्यामध्ये एक वर्ष वाढवण्यात आले आहे. त्यानंतरचा टप्प्या हा प्राथमिक विभागांचा असणारा आहे. यामध्ये 6वी ते 8वी या 3 वर्गापर्यंत समावेश होणार आहे. अगोदर त्यामध्ये 5वी ते 7वी असा टप्प्या होता.

त्यामध्ये माध्यमिक कडून 8 वी वर्ग काढून ती प्राथमिकला 10 वी ऐवजी आता 12वी बोर्ड असणार आहे.माध्यमिकचा टप्प्या 9 ते 11 राहणार आहे.नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. 21व्या शतकातील हे पहिले पाउल आहे.1986ला राबविलेले शैक्षणिक धोरण 34 वर्ष कार्यरत होते.

त्यामध्ये आता पुढील शैक्षणिक वर्षापासुन बदल करण्यात येत आहे.या धोरणामध्ये सर्वांना संधी,दर्जात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार शिक्षण असे 3 स्तंभ यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. 2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी यांचा संवाद होणार आहे.

शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्पक शिक्षण केंद्रे उभी केली जाणार आहेत. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण अशा दोन्ही पातळींचा अवलंब यामध्ये आहे. भारतात जवळपास २ कोटी मुले शाळाबाह्य आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे. ५+३+३+४ असा एकूण १५ वर्षांचा अभ्यासक्रम आहे.

या नव्या शैक्षणिक धोरणात बोर्ड परीक्षा कुठली, हा प्रश्न अनेक दिवस अनुत्तरित आहे. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आता अकरावी बोर्ड करावे लागणार असताना, बारावी बोर्डाची परीक्षा जाहीर झाली आहे.