⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | सौरऊर्जा क्षेत्रात तरुणांना व्यवसायाच्या नव्या संधी, दिवसेंदिवस वाढतोय कल

सौरऊर्जा क्षेत्रात तरुणांना व्यवसायाच्या नव्या संधी, दिवसेंदिवस वाढतोय कल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । भारतीय संस्कृती मध्ये सूर्याला खूप महत्व दिले जाते, यावरून आपल्याला समजते की प्राचीन काळी सुद्धा लोकांना सौरऊर्जेच महत्व समजले होते. ऊर्जेचा मोठा व प्रमुख स्त्रोत म्हणजे सौरऊर्जा एका बाजूला शहरीकरणामुळे वाढलेली ऊर्जेची मागणी प्रदूषण, तापमानातील वाढ व वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अपारंपारिक ऊर्जेची गरज भासत आहे. अपारंपारिक ऊर्जामध्ये सर्वात उपयोगी म्हणजे सौरऊर्जा, भारत देशाच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतला तर बऱ्याच परिसरात अशी सूर्यकिरणे मिळतात जिथे सौरऊर्जा उत्पादनाला वाव आहे.

सौरऊर्जा मध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय केले जाऊ शकतात. सौर पैनल बसवण्यासाठी खूप मोठी चालना मिळत आहे. मोठी घरे, बँक, कॉलेज, हौसिंग सोसायटी, हॉटेल, हॉस्टेल इ. ठिकाणी छतावरती मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असते.त्यामुळे हेच आपले ग्राहक बनू शकतात.

सौरऊर्जा व्यवसायाची सुरुवात मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे आर्थिक क्षमता व तांत्रिक ज्ञान, सोलर व्यवसायाची सुरुवात एजंट होण्यापासून ते डिलर शिप घेण्यापर्यंत होऊ शकते. मोठ्या सोलर कंपनीचे उत्पादन विक्री करून कमिशन तत्वावर सुद्धा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. व्यवसाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम मार्केटिंग ग्राहकांना हर सौरऊर्जेचे महत्व पटवून देता आले. तर हा व्यवसाय नवीन उद्योजकांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. सोलर यंत्रणा उभी करताना महवाची गोष्ट असते त्याची तांत्रिक बाजू, सोलर पैनलचे डिझाईन करणे त्याचे इंस्टालेशन करणे, असलेल्या जागे नुसार यंत्रणा बसवून घेणे यासाठी टेकनिकल टीम असावी लागते. अशी एक टीम बनवून सुद्धा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

सौर फार्मिंग एक नवी संकल्पना

फळे, भाजी, कापसाची शेती, धान्याची शेती हे प्रकार आपण ऐकले आहे. पण सूर्याची शेती केली जाऊ शकते व त्यासाठी ओसाड व नापीक जमीन असली तरी चालते. ज्या जागेवर कोणतेच पीक घेतले जाऊ शकत नाही..त्या जागेवर सूर्याची शेती केली जाऊ शकते म्हणाजे ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते. ग्रामीण भागात अशा प्रकारचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो. जेथे काही पिकात नाही व पाण्याची कमतरता आहे. अशा परिसरात ग्रामस्थांनी एकत्र येऊन छोट्या क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प उभे करायला हवे. इतक्या सर्व अनुकूल गोष्टी असताना उद्योग सहज उभा राहू शकतो. व्यवसाय पैसा मिळवून देत असला तरी त्याचा मुख्य हेतू हा स्वच्छ व शाश्वत ऊर्जा निर्मिती साठी चालना देणे आहे, व या व्यवसायातून आपण निसर्ग वाचवू शकतो. जर सर्वच लोकांनी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून दैनंदिन जीवन जगण्यासाठी संकलप केला तर काळा नुरुप लोकांमध्ये बदल घडण्यास वेळ लागणार नाही.

अपारंपारिक ऊर्जा वर चालणारी उपकरणे

सौर बंब, सौर कुलर, सौर कृषी पंप, सौर दिवे, सौर गृह प्रणाली ई. चा आपण आपल्या वापरा मध्ये वापर करू शकतो. व या गोष्टींचा पण व्यवसाय होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषणाला पण आळा बसेल व मानवी जीवन सुखमय होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला सौर उर्जेच वरदान लाभलेले आहे. तंत्र ज्ञानाच्या मदतीने वीज निर्मितीसाठी सूर्य प्रकाशाचा वापर जगभरात होतो. त्यामुळे युवकांनी आपल्या शिक्षणाचा व बुध्दी मत्तेचा वापर करून सौर ऊर्जे पासून उत्पादन बनवले तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाची खूप प्रगती होऊ शकते. – सौरभ कुलकर्णी, सौर उद्योजक जळगाव,

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह