जळगाव जिल्हामुक्ताईनगर

चारठाणा येथे राष्ट्रवादीचा मेळावा संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार नुकताच पडला. अध्यक्षस्थानी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे हे होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, प.स.सभापती विकास पाटील, जि.प.सदस्य निलेश पाटील, माजी प.स.सभापती दशरथ कांडेलकर, राजू माळी, विलास धायडे, सुभाष पाटील, तालुका अध्यक्ष युडी पाटील, युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना कांडेलकर, संदिप देशमुख, रामभाऊ पाटील, सुभाष टोके, डॉ.बिसी महाजन, विशाल महाराज खोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने इको टुरिझम निधी अंतर्गत मंजूर असलेल्या व काम पूर्णत्वास गेलेल्या भवानी माता मंदिर येथील डोम सभागृहाचे आणि विठ्ठल मंदिर येथील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. मेळाव्याचे प्रास्ताविक करताना तालुका अध्यक्ष युडी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी प्रक्रिये विषयी माहिती दिली. रोहिणी खडसे खेवलकर या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, गेल्या तिस वर्षा पासून आपण सर्व नाथाभाऊ यांच्या पाठीशी उभे राहिलात आता सुद्धा हि साथ अशीच कायम राहू द्या व येत्या सर्व निवडणुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा, आपल्या गावातून परिसरातून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा, आपल्या नाथाभाऊ यांनी सुरू केलेल्या आपल्या परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी ज्याप्रमाणे जोंधनखेडा धरणासाठी निधी उपलब्ध करून दिला तसा भरीव निधी या योजनेसाठी लवकरच प्राप्त होईल. आपल्या सरकारच्या माध्यमातून इतर विकास कामांसाठी सुद्धा निधी उपलब्ध होणार आहे असे सांगितले.

यावेळी रमेश खंडेलवाल, रणजित गोयनका, मनिषा ताई देशमुख, पुंडलिक कपले, बाळा सोनवणे, पुरकर,विलास पुरकर, विष्णू पुरकर,पवन म्हस्के, महेश भोळे ,रवींद्र दांडगे, वाल्मिक भोलानकर ,सुनिता मानकर, बापू ससाणे, प्रवीण पाटील, शकील सर, बुलेस्ट्रेन भोसले व कुऱ्हा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button