Monday, August 15, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

चमत्कार झाला.. नंदी पाणी पिऊ लागला, ‘अंनिस’ने जाहीर केले २१ लाखांचे बक्षीस

चेतन वाणीbyचेतन वाणी
March 5, 2022 | 5:01 pm
nandi drinking water anis announced prize of 21 lakh

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । श्रद्धेच्या बळावर जग जिंकता येऊ शकेल, असे म्हटले जाते. गणपती दूध पितो, नंदी पाणी पितो अशा घटना अधूनमधून कुठे ना कुठे घडतच असतात. एकाच दिवशी राज्यभर महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पित असल्याची चर्चा सोशल मीडिया माध्यमातून पसरली आणि मग काय सर्वत्र मंदिरात गर्दी झाली. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे पहिला प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी तसा प्रयत्न केला असून नंदी पाणी पीत असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हे एक विज्ञान असून अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सांगत सिद्ध करून दाखविले तर २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

श्रद्धेच्या जगात भक्तिभावसोबतच अंधश्रद्धा देखील मोठ्या आहेत. दरवर्षी कुठे ना कुठे काही ना काही चर्चा होतच असते. कधी गणपती दूध पितो तर कधी नंदी पाणी पितो, कुठे दगड गोल फिरतो तर कुठे मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू, कुंकू बाहेर पडते असे प्रकार समोर येत असतात. प्रत्येकवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकारांचे खंडन केले जाते आणि त्याला विज्ञानाची जोड देण्यात येत असते.

नुकतेच महाशिवरात्री पार पडली असून शनिवारी असाच एक प्रकार समोर आला. महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पीत असल्याची माहिती गावभर पसरली. नातेवाईकांनी राज्यभरात एकमेकांना फोन करून माहिती दिली आणि आपल्या परिसरातील मंदिरात हा प्रयोग करून पाहण्याचे सांगितले. जळगाव शहरालगत असलेल्या शिरसोली गावातील एका मंदिरात हा प्रकार सकाळी १० वाजता सुरु झाला. नंदीच्या मूर्तीला काही भाविकांनी चमच्याच्या साहाय्याने पाणी पाजून पाहिले. एक-एक करता सर्वांच्याच हाताने नंदी पाणी पिऊ लागला.

बघता-बघता भाविकांच्या रांगा लागल्या. घरून ग्लास, तांबे घेऊन लोक मंदिरात येऊ लागले. भगवान महादेवांच्या नावाचा जयघोष करीत नंदीला पाणी पाजू लागले. जळगाव जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. काहींनी हा प्रकार अंधश्रद्धा समजला तर काहींनी श्रद्धा समजून इतरांना देखील कळविले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा.दिगंबर कट्यारे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता, नंदी किंवा गणपती कधीच पाणी, दूध पित नसतो. वैज्ञानिकदृष्ट्या पाण्याच्या पृष्टीय ताणाच्या अप्रभावामुळे हा प्रकार घडत असतो. पाणी आणि मूर्ती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याने त्या काहीश्या आकर्षित होऊ शकतात. एखादा साधा दगड देखील १ किंवा २ थेंब पाणी आतमध्ये घेऊ शकतो. सोशल मीडियाचा गैरवापर करीत ही अफवा पसरवली जात असून नागरिकांच्या श्रद्धेचा उपयोग केला जात आहे. नंदी पाणी पितो असे कुणी सिद्ध केल्यास त्याला २१ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे प्रा.कट्यारे यांनी स्पष्ट केले.

पहा व्हिडिओ :

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in धार्मिक, जळगाव जिल्हा, ब्रेकिंग, महाराष्ट्र, व्हिडीओ
Tags: jalgaondistrictmahadevnandimiracleshirsoli
SendShareTweet
चेतन वाणी

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
rasta

मुक्ताईनगर तालुक्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची

examinations for medical

बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये १ प्रश्न चुकला, विद्यार्थ्यांना 'इतके' गुण मिळणार

devkar hospital

देवकर रूग्णालयाने गाठला 275 शस्त्रक्रियांचा टप्पा

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group