⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन !

धरणगाव येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जीपीएस मित्र परिवारातर्फे धरणगाव येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे येत्या रविवारी (1 सप्टेंबर) रोजी आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

धरणगाव येथे येत्या रविवारी गुलाबराव पाटील मित्र परिवारातर्फे भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्या रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असेल त्यांच्यावर पनवेल येथील आधुनिक सुविधांसह सुसज्ज असणाऱ्या शंकरा आय हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

तसेच रुग्णांसाठी प्रवास, जेवण व राहण्याची व्यवस्था मोफत असणार आहे. या शिबिराचा गरजू रुग्णांनी आवर्जून लाभ घ्यावा व शिबिराची माहिती इतर गरज रुग्णांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन गुलाबराव पाटील मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.