जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । केंद्र शासनाने पारित केलेल्या अग्निपथ योजनेचा अमळनेरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. दरम्यान, केंद्र शासनाने या योजनेत योग्य तो बदल न केल्यास जिल्ह्याचे खासदार यांच्या कार्यलयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी गायकवाड यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले.
मोदी सरकारने नुकतेच देशभरातील युवकांसाठी अग्निपथ योजना सुरु करण्याचे जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी योजनेची घोषणा करताच देशभरात विशेषतः उत्तरेकडील राज्यात तरुणाईने योजनेला विरोध सुरु केला. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असलेला हा विरोध वाढत जाऊन बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआरमध्ये सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला तीव्र विरोध करण्यात आला. ठिकठिकाणी दंगल, तोडफोड, जाळपोळ झाली. काही ठिकाणी रेल्वे रुळ उखडण्यात आले. रेल्वेरोको झाला. रेल्वेवर दगडफेक देखील झाली. भाजप नेत्यांच्या घराला घेराव घालण्यात आले. त्यासोबत आता अमळनेरात देखील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, शहराध्यक्ष सनी गायकवाड, युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश पाटील, कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शहराध्यक्ष तौसिफ तेली, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे दुर्गेश साळुंखे, कृष्णा बोरसे, तेजस पाटील, उज्वल निकम, आकाश सैदाने, शुभम सुर्यवंशी, आदित्य संदाशिव, दर्शन पाटील, गौरव राजपूत, वैभव राजपूत, यश राजपूत, वेदांत पाटील, ऋषी बोरसे, बाबाजी पाटील, हिमांशू पाटील, दिग्विजय निकम, समीर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.