---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

..तर आश्चर्य वाटून घेवू नका ; एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२३ । अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीतील या फूटीनंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.,

eknath khadse 1 jpg webp

अलीकडचे काँग्रेसचे वातावरण पाहता तसेच कर्नाटकमधील विजय लक्षात घेता. काँग्रेसमधून कोणी राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांमध्ये जाईल अशी स्थिती वाटत नाही. उलट काँग्रेसमुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्‍या आहेत. त्यामुळे भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपमधून कोणी काँग्रेसमध्ये गेले तर आश्चर्य वाटून घेवू नका; असे मत एकनाथ खडसे यांनी मांडले आहे.

---Advertisement---

दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्याने त्यांना अनेक आमदारांनी साथ दिली आहे. यावर बोलताना खडसे म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेलेले नाही. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. अजितदादांना त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की माझ्यासोबतही मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न दिसतो आहे. पण दुर्दैवाने अजून तरी त्यांना कोणी प्रतिसाद देत नाही,

मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत, की ते अजित पवार यांच्या सोबत आहेत. स्वभाविक त्यांना जोडीदार हवा आहे. त्यामुळे ते प्रत्येकाला आवाहन करत आहेत. असंही खडसे म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---