..तर गिरीष महाजनांचा सहभाग समोर येईल : एकनाथराव खडसे

मे 24, 2021 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर बीओटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात मोठा घोटाळा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला असल्याचा गंभीर आरोप ॲड. विजय भास्कर पाटील यांनी केला होता. दरम्यान, आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केल आहे. बीओटी गैरव्यवहारात गिरीश महाजन यांचा सहभाग असेल तर तो चौकशीतून समोर येईल,असं खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथराव खडसे जळगावी असता त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

eknath khadse girish mahajan

जामनेर बीओटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात गिरीश महाजन यांनी २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ॲड. पाटील यांनी केला आहे. या प्रकरणावर बोलताना खडसे म्हणाले की, टेंडर हे शर्मा यांच्या नावाने निघाले असून काम दुसर्‍यानेच केलेले आहे. यात खूप अनियमितता आहे. यात उर्दू शाळेला पैसे भरण्यात आलेले नाही. तसेच यात अनेक नियमांचा भंग करण्यात आलेला आहे. या संदर्भात त्री-सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे. यामध्ये आ. गिरीश महाजन यांचा सहभाग असल्याचा आरोप असल्याचे अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केले आहेत. मात्र यातून चौकशीत समोर काय ते येणार असल्याचे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

दरम्यान, तोक्ते चक्रीवादळामुळं महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मोठ नुकसान झालं आहे. काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गुजरातची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी गुजरातला एक हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रालाही पंतप्रधान मोदींनी मदत जाहीर करावी, अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now