जळगाव जिल्हा
नवरात्रोत्सव : ड्रीम लेडी किटी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम!
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२२ । नवरात्रोत्सवानिमित्त मातोश्री आनंदाश्रम सावखेडा बु। येथील आजी आजोबांना दांडिया खेळण्याची खूप इच्छा असल्याची माहिती व्यंकटेश कॉलनीतील ड्रीम लेडी किटी ग्रुपला मिळाली. त्यानुसार गृपचे सर्व सदस्य आजी आजोबा सोबत दांडिया खेळण्यासाठी येथे गेले. आजी आजोबा सोबत दांडिया खेळले, आजचा जो क्षण खूपच अविस्मरणीय असा होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता व जगण्यातले क्षण आनंदी करून गेला. अशी भावना यावेळी ड्रीम लेडी किटी ग्रुपतर्फे व्यक्त करण्यात आली.
यावेळी मनिषा पाटील, स्वाती चौधरी, जयश्री फिरके, परमा गिलडा, संगीता चौधरी, संगीता बरडे, लीना पवार, मीनाक्षी बेंडाळे, अनिता कांकरिया, संजय काळे, आजी, आजोबा व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.