जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील निंभोरा बु!येथील ग्रामपंचायतचे सरपंच सचिन सुरेश महाले यांना नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूह व सोशल सामाजिक ग्रुप त्यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातून एकमेव सरपंच सम्राट म्हणून सन्मानित करण्यात आले.राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी व रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी,तसेच नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाचे संपादक संजय मलमे व ग्रुप प्रेसिडेंट ए. श्रीनिवास, यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
कर्तृत्व हेच खरे नेतृत्व या म्हणीप्रमाणे सरपंच सचिन महाले यांनी निंभोरा येथे १६ फेब्रुवारी २०२१ पासून ते आज तागायत गावाच्या अधिकाधिक सर्वांगीण विकासासाठी जी धडपड करत आहे या धडपडीची व विकास कामांची दखल घेत त्यांना जिल्हाभरातून एकमेव असा सरपंच सम्राट पुरस्कार सन्मानपत्र सन्मानचिन्ह देत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आपल्या कार्यकाळात त्यांनी निंभोरा गावासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिलांना अहिल्याबाई पुरस्काराने सन्मानित केले. तसेच अनेक दिवसापासून मागणी असलेला रिंग रोडचे काँक्रीटीकरण,विविध प्रकारचे आरोग्य विषयक शिबिरे, दिव्यांग बांधवांसाठी किराणा किट वाटप, तसेच कोरोना काळात तत्परतेने केलेले उल्लेखनीय कार्य, माजी सैनिकांच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण,डास नियंत्रण फवारणी, तसेच गावात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी गावातील हिंदू -मुस्लिम बांधवात एकोपा रहावा यासाठी सतत प्रयत्न आणि शासन स्तरावर विविध लोकप्रतिनिधी मंत्री, खासदार,आमदार यांच्या माध्यमातून कामे खेचून आणण्यासाठीची कार्यशैली, अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून विविध आदर्श ग्रामपंचायतींना भेटी, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, तसेच नवीन ग्राम सचिवालय इमारत, कचरा संकलनासाठी घंटागाडी, असे अनेक कामे केल्याने त्यांना हा एकमेव पुरस्कार जिल्हाभरातून मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.