बुधवार, सप्टेंबर 27, 2023

काम सोडल्याच्या रागातून मालकाने केली सुरक्षा रक्षकाला मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। एमआयडीसीतील भास्कर मसाले कंपनीत असलेल्या सुरक्षा रक्षकाने काम सोडले म्हणून कंपनी मालकाने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज झिपरू तडवी (वय-४२) रा. पांडे चौक, तुकाराम वाडी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते एमआयडीसील मधील भास्कर मसाले कंपनीत सेक्यूरीटी म्हणून नोकरीला होते. त्यांनी ते काम काही दिवसांपुर्वीच सोडले होते. दरम्यान, मनोज तडवी हे ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता एमआयडीसीतील गोपल दालमिल चौकातून जात असतांना भास्कर मसाले कंपनीचे मालक भुषण मराठे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याने सुरक्षा रक्षकाचे काम सोडल्याच्या रागातून त्यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

तसेच “तु जर मला पुन्हा दिसला तर तुला पुन्हा मारेल” अशी धमकी दिली. दरम्यान तडवी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भास्कर मसाले कंपनी मालक भुषण मराठे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.