⁠ 
बुधवार, मे 8, 2024

राष्ट्रवादी‎ अल्पसंख्यांक प्रदेश‎ सरचिटणीसपदी नौमान काजी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । चोपडा‎ शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते‎ नौमान काजी यांची राष्ट्रवादी‎ अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र‎ प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती‎ करण्यात आली आहे.‎ नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी‎ अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष‎ ऍड.मोहम्मद खान पठाण‎ यांच्याहस्ते त्यांना देण्यात आले.‎

यावेळी सुलतान मालदार ( प्रदेश‎ उपाध्यक्ष राष्ट्रवादी), नाज़िमुद्दीन‎ शेख (सरचिटणीस‎ अल्पसंख्यांक), युसूफ कुरेशी(‎ प्रदेश सचिव राष्ट्रवादी‎ अल्पसंख्याक), फैसल मेमन‎ (प्रदेश चिटणीस), रईस काजी‎ (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी‎ अल्पसंख्याक), प्रफुल्ल महेंद्र‎ स्वामी (जिल्हा सरचिटणीस‎ राष्ट्रवादी युवक काँग्रेस), प्रफुल्ल‎ सुरेश पाटील (शहर कार्याध्यक्ष)‎ आसिफ सैय्यद उपस्थित होते. या‎ निवडीबद्दल चोपडा तालुका‎ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते,‎ पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले‎ आहे. सर्वसामान्यांना शासकीय‎ योजनांचा लाभ मिळवून देण्याचा‎ मानस त्यांनी व्यक्त केला.‎