राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा येथे राष्ट्रवादी युवकतर्फे वाढत्या महागाई बाबत २९ रोजी केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत खासदार रक्षा खडसे यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कृषी मंत्रालयाने रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड भाववाढ करुन शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट घातला आहे. रासायनिक खताच्या किंमती वाढवुन शेतकरी हिताविरुध्द असलेलं मोदी सरकार बळीरज्याचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. मागील महिन्यात पोटॅशचे दर प्रतिबॅग ८५० रु. होती. तसेच १०:२६:२६ ची बॅग ११७५ होते परंतु आताचे दर पोटॅश १७८० तर १०:२६:२६ चे १६४० रु. वर गेले आहे. आधीच निसर्गाचा लहरीपणा त्यात या सुलतानी सरकारने खताचे भाव शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर केले असल्याने शेती करावी कशी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्र दिवस जिवाचे रान करुन घाम गाळून मेहनत करणारा शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सर्वच स्तरातुन शेतकरी वर्गाची पिळवणूक होत असतांना केंद्र सरकार बघ्याची भुमिका घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. दरम्यान आंदोलन कर्त्यांनी कृषी पंपाची वीज तोडणी तात्काळ थांबवावी तसेच घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या सामान्य जनतेला वाळु उपलब्ध करण्यात यावी अशा विविध विषयांवर राज्य सरकारला निवेदन दिले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका ऍड. रोहिणी खेवलकर, माजी सभापती सुधाकर पाटील, तालुका अध्यक्ष युडी पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, बाजार समितीचे निवृत्ती पाटील, वसंत पाटील, किशोर चौधरी, विलास धायडे, राजु माळी, डाॅ.प्रदिप पाटील, पांडुरंग पाटील, लिलाधर पाटील, भाऊराव पाटील, साहेबराव पाटील, जितेंद्र पाटील, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, बाळु पाटील, राजेंद्र पाटील, अतुल पाटील, सोपान दुट्टे, दिलीप पाटील, राजेश ढोले, नंदु हिरोळे यांच्या सह कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- जळगावमध्ये तापमानात मोठी वाढ, थंडीही ओसरली; आता पुढे कसं राहणार हवामान? वाचा..
- Gold Price : जळगावच्या सुवर्णबाजारात घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ