⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काढला मोर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । केंद्र शासनाच्या मनमानी व जिवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांच्या विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीदार राहुल सोनवणे व महसुलचे कोषागार मुक्तार तडवी यांना निवेदन देण्यात आले .

देशातील नागरीकांना आवश्यक असलेल्या जिवनावश्यक वस्तूंपासून ते घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणुच्या भयानक संकटामुळे मानसिक व आर्थिक अडचणीत आलेल्या सर्वसामान्य माणसाचे जिवन जगणे हे कठीन झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या मनमानी व जिवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढुन आंदोलन करण्यात आले.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारापासून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, तालुका समन्ययक किशोर माळी, युवकचे कार्याध्यक्ष किशोर पाटील, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हितेश गजरे, राजेश करांडे, राहुल चौधरी, राकेश सोनार, तात्या कोळी, यशवंत अडकमोल, ऍड. अल्ताफ पटेल, अश्पाक पटेल, शुभम विचवे, कैलास अडकमोल, चंद्रकांत कोळी, मुस्तफा तडवी, समाधान पाटील, धनराज फालक, दानिश पटेल, विजय भोई, भरत मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी या महागाई विरोधी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी नायब तहसीदार राहुल सोनवणे व महसुलचे कोषागार मुक्तार तडवी यांना निवेदन देण्यात आले.