अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

जुलै 29, 2022 2:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । महामार्ग ६ वरील अपघाताचे प्रमाण काहीसे वाढतच चालले आहे. अशातच महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडलीय. हरीओम धनाजी पाटील (वय-३८, रा. नायडोंगरी ता. चाळीसगाव ह.मु. श्रध्दा कॉलनी, गोदावरी चक्कीजवळ जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

hariom patil jpg webp

हरीओम पाटील हा आईवडीलांसह वास्तव्याला आहे. बांधकामाचे साहित्य पुरविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. हरीओम पाटील हा गुरूवार २८ जुलै रेाजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त जळगावहून नशिराबाद कडे दुचाकीने जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हरीओमचा जागीच मृत्यू झाला. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली होती.

नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शुक्रवारी २९ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई दगूबाई, वडील धनाजी गंधार पाटील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now