---Advertisement---
जळगाव जिल्हा प्रशासन महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान, जळगावच्या राजश्री पाटील सन्मानित

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. तीन परिचारिकांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

IMG 20221108 WA0000 jpg webp webp

वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 50 पर‍िचारिकांना तसेच परिचारक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.

---Advertisement---

सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथ‍ील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांचे प्रभावीर‍ित्या अंमलबजावणी केलीली आहे. श्रीमती जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. श्रीमती जाधव यांनी क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान‍ित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. श्रीमती पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेले आहे.

पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका (वीएचएन) तसेच राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांना ही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सद्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारीका आहेत. 1989 मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये तसेच लातूर येथे आलेल्या भुकंपाच्या प्रसंगी पुर्नवसन झालेल्या रूग्णांची सेवा श्रीमती कोरेकर यांनी केली आहे. वर्ष 2018 मध्ये त्यांना युनीसेफतर्फे लसीकरणाची अंमलबजावणी उत्कृष्ट करण्यासाठी अ दर्ज्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोव‍िड काळात केलेल्या रूग्ण सेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने विविध 4 पुरस्कार तर जागत‍िक आरोग्य संघटनेच्यावतीनेही पुरस्कृत करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची सुपूत्री मीरा धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार
मूळ नागपूरच्या असणा-या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रामा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील 30 वर्षापासून त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोविडच्या काळात एम्समध्ये सुनियोज‍ित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात श्रीमती धोटे यांनी महत्वपूर्ण भुमिका निभावली. संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल श्रीमती धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.

प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष 2021 असून एकूण 50 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे. अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहिर झाला होता. तथापि काही अपरीहार्य कारणास्वत त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---