---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर राजकारण

नाथाभाऊंना शिवीगाळ, रोहिणी खडसेंशी अरेरावी : राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या घरी सेनेचा राडा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असून बोदवड येथून प्रकाराला सुरुवात झाली. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने टाकलेल्या पोस्टचा राग आल्याने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी चालून जात वाद घातला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, घटनास्थळी वाद मिटविण्यासाठी गेले असता सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर धावून येत अरेरावी केली. जिल्ह्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित करीत वेळ पडल्यास उद्या आम्ही आमदारांना देखील चोप देऊ अशी संतप्त भुमिका ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना व्यक्त केली.

eknath khadse chandrakant patil jpg webp

मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुक्ताईनगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचे पती राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी असून त्यांनी सोशल मिडियात एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर केल्याचा राग आल्याने दि.२४ रोजी रात्री १०.२२ वाजता ईश्वर हटकर याने महिलेच्या पतीला फोन करून धमकीसारखा फोन केला. रात्री १०.३ वाजता ईश्वर हटकर हा घरासमोर येऊन मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करीत असल्याने महिला घराबाहेर आली असता ईश्वर हटकर याने त्यांचा हात धरत लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले. तसेच आम्ही आमदार चंद्रकांत पाटलांचे माणसे आहोत. आम्हाला त्यांनी पाठविले आहे. घराबाहेर १५-२० लोक जमलेले होते. त्याच वेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील त्याठिकाणी आला आणि नाथाभाऊ यांना शिवीगाळ करून ई.डी.चे २ कोटी कुठे गेले असे म्हणू लागला. घराबाहेर मोठी गर्दी असल्याने पीडितेने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी ऍड.रोहिणी खडसे यांना फोन केला. काही वेळाने त्यांच्यासह दोघे आल्याने सुनील पाटील आणि ईश्वर हटकर हे नरमले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोलीस अधिकारी प्रदीप शेवाळे करीत आहेत.

---Advertisement---

घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हा बँक संचालिका तथा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याशी संपर्क केला असता, बोदवड नगर पंचायत निवडणुकीच्या वेळी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा केली होती. जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांच्याविरुद्ध देखील अपशब्द वापरले होते. याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रारींचे निवेदन दिले आहे. तेव्हा देखील शिवसेनेचे काही पदाधिकारी माझ्या अंगावर धावून आले होते मात्र ऍड.रविंद्र पाटील पुढे आल्याने मी बचावले. सोशल मिडियात कुणी काय पोस्ट करावे हा ज्याचा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आमच्या विरोधात, नाथाभाऊंच्या विरोधात देखील काही लोक शिवीगाळ, आरोप करणारे स्टेटस, पोस्ट टाकत असतात. काल घडलेल्या प्रकारानंतर जर लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचे काय? एखाद्या महिलेवर भर रस्त्यावर अन्याय होत असेल तर यापुढे महिला शांत बसणार नाही. मुजोरपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर वेळ पडल्यास उपोषणाला देखील बसावे लागेल. काल वेळीच पोलीस आले नाहीतर दोघांना महिलांनीच चोप दिला असता असेच सुरु राहिले तरं उद्या आम्ही महिला आमदाराला देखील मारहाण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशा इशारा ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दिला आहे.

ऍड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिलेशी असभ्य वर्तन केल्यानंतर देखील त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काहीही वाटत नाही. गुन्हा दाखल झाल्याचा त्यांना अभिमान वाटत असून तसे स्टेटस त्यांनी सोशल मिडियात शेअर केले आहे. ज्याच्यावर केस नाही तो शिवसैनिकच होऊ शकत नाही. केस म्हणजे आमच्या कामाची पावती आहे अशा पोस्ट शिवसेनेचे कार्यकर्ते सोशल मिडियात शेअर करीत आहेत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---