नशिराबाद खून प्रकरण : दोघांना २७ पर्यंत पोलीस कोठडी

सप्टेंबर 22, 2021 4:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । नशिराबाद येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या खून प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

new 4 4 jpg webp

भुसावळ येथील पंचशील नगरात राहणारा धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय-१९) हा खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर वडील मनोहर आत्‍माराम सुरळकर यांच्यासोबत दुचाकीवर घरी जात होता. नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ दोघांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत गोळीबार केला होता. हल्ल्यात धम्मप्रिय याचा जागीच मृत्यू झाला तर मनोहर सुरळकर हे गंभीर जखमी झाले होते.

नशिराबाद पोलिसांनी याप्रकरणी शेख शमीर उर्फ समीर उर्फ भांजा शेख जाकीर वय-२१ आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन वय-२१ यांना अटक केली होती. मनोहर सुरळकर यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांना बुधवारी न्या.सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिसांकडून सात दिवस पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने दोघांना २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नशिराबाद पोलिसांनी रेहानुद्दीनच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आणि घटनास्थळाहून एक काडतुस हस्तगत केला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now