नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार! 45 प्रवाशांनी खचाखच भरलेली शिवशाही बस पेटली

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । नाशिकमध्ये खासगी बसला लागलेल्या आगीत अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये बर्निंग बसचा (Nashik Accident) थरार पाहायला मिळालाय. या बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. मात्र या प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरवण्यात आल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
नाशिक पुणे महामार्गावर चालत्या एसटी बसने पेट घेतला. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या शिवनेरी बसने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. नाशिकहून ही बस पुण्याला जात होती. पण अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे लगेच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली.

या बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. या प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरवण्यात आल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला. मात्र बघता बघता संपूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेचा व्हिडीओ IBNLokmat च्या वेबसाईवर प्रसारित झाला आहे.

मात्र बस पेटण्याच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जाते आहे. 24 तासांपूर्वी पुण्यात शिवशाही बसला आग लागली होती. ही घटना ताजी असताना आता नाशिक पुणे महामार्गावर शिवनेरी बसने पेट घेतला आहे.