पुनखेडा येथील कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी नारायण धनगर

एप्रिल 19, 2022 12:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये एकूण बारा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यात नारायण धनगर यांची सलग दुसऱ्यांदा संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

puja 1 jpg webp

त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ते रावेर माध्यमिक सोसायटीचे विद्यमान संचालक पंडित धनगर यांचे बंधू आहेत. दरम्यान, दुसऱ्यांदा संचालकपदावर संधी मिळाल्याने शेतकरी हिताचे काम जोमाने करू असे धनगर यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now