गुरूवार, जून 8, 2023

माझा आशीर्वाद आणि राजकीय पाठिंबा गिरीश महाजनांनाच ! – ईश्वरलाल जैन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. मात्र, जामनेर मतदारसंघासाठी माझा आशीर्वाद आणि राजकीय पाठिंबा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना कायम आहे.

असे स्पष्ट मत पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केले. याबाबत आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिली आहे असेही ते म्हणाले. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

मी अडचणीत असताना, अनेकांनी मला सहकार्य केले. त्यात मंत्री गिरीश महाजनांचा वाटा मोठा आहे. जामनेर मतदारसंघात त्यांचे कार्य आजही चांगले आहे. त्यामुळे विरोध कशासाठी करायचा? शरद पवार यांना समक्ष भेटून आपण त्यांना सर्व माहिती दिली आहे. त्यांनाही मी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी पटल्या आहेत.