जळगावात सलग दुसऱ्या दिवशी खून, चितोडा येथे चिरला तरुणाचा गळा

ऑगस्ट 22, 2022 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । Yawal Murder News । यावल तालुक्यातील चितोडा येथील 38 वर्षीय युवकाची चाकूने गळा चिरून तसेच चाकूचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्या. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या घडली असलीतरी खुनाचा प्रकार मात्र सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे. मनोज संतोष भंगाळे (38, चितोडा, ता.यावल) असे मयत युवकाचे नाव आहे.

murder 2

मध्यरात्रीच्या सुमारास केला खून
चितोडा गावातील रहिवासी असलेल्या मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंदूशेठ चौधरी यांच्या शेतात असल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. यावल पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर यावलचे पोलिस राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गणेश ढाकणे, रोहिल गणेश, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी व पोलिसांचा ताफा दाखल झाला.

मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने ओढून रस्त्याला लागून असणार्‍या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. मनोज भंगाळे हा कुणाच्या अध्यात-मध्यात पडत नव्हता. सर्वांशी मनमिळावू सभावाने राहणाऱ्या मनोज भंगाळे या तरुणाच्या खुनाची घटना समजताच गावातील मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. मात्र हत्येचे कारण अद्यापही समोर आले नसून या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत मनोज भंगाळे याचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now