पुन्हा खून : 36 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या आरोपीला तासाभरातच अटक

शिरपूर येथे शौचालयाबाहेर लघूशंका केल्याच्या रागातून सिमेंट कॉक्रीट रस्त्यावर 36 वर्षीय युवकाला आपटल्याने त्याचा मृत्यू ओढवला. ही घटना 10 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या घटनेत रामभाऊ भगवान माळी (36, रा.मराठे गल्ली, शिरपूर) या युवकाचा मृत्यू झाला तर संशयीत मनोज भगवान मराठे (ईदगाह नगर, शिरपूर) यास अटक करण्यात आली.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
खुनाची माहिती कळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर ,पीएसआय किरण बार्‍हे, संदीप मुरकुटे, गणेश कुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार संशयीतास एक दीड तासातच शोध पथकाने शहादा रस्त्यावरून ताब्यात घेतले.

लघूशंका केल्याच्या रागातून तरुणाला आपटले
मंगळवार, 10 जानेवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास शहरातील मराठागल्ली जवळील सार्वजनिक शौचालयजवळ तरुणाने लघूशंका केल्याच्या रागातून संशयीत मनोज मराठे याने तरुणाला रस्त्यावर आपटले मात्र डोक्याला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ज्ञानेश्वर बळीराम रोकड (रा.मराठा गल्ली, शिरपूर) यांच्या तक्रारीवरून संशयीत मनोज भगवान मराठे (ईदगाह नगर, शिरपूर) यास अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक किरण बार्‍हे करीत आहे.