महापालिकेचा निवडणूक निकाल उशिराने लागणार? नेमकं काय आहे कारण?

जानेवारी 11, 2026 2:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी सध्या प्रचाराचा धुरळा उडाला असून येत्या १५ जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान होणार आहे. तर दुसर्‍याच दिवशी १६ जानेवारी रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. पण निवडणूक निकाल संपूर्ण जाहीर होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

loksabha election jpg webp

मनपा निवडणुकीसाठी एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी स्पष्ट होणारे निकालाचे चित्र मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होणार की नाही याची खात्री नाही. याच कारणामुळे मनपा निवडणुकीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.

सर्वात आधी टपाली मतदान मोजणी होईल. त्यानंतर वॉर्डनिहाय मत मोजणी होईल. जर एका वेळी एकाच वॉर्डची मतमोजणी गृहित धरली तर या प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागेल. एकाच प्रभागाची मतमोजणीसाठी साधारणत: एक ते दीड तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

त्यानुसार, ज्या महापालिकांचे कमी प्रभाग आहेत, तिथले चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण राज्यातील मोठ्या महापालिकांचे निकाल हाती येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया लांबली तर पोलीस यंत्रणा आणि मतमोजणी केंद्रावर ताण येण्याची शक्यता आहे. याशिवाय कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories