⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव मनपातील ‘त्या’ पाच नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी पालिका आयुक्तांचा न्यायालयात अर्ज

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा ठोठावलेल्या भाजपच्या पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात महासभेच्या ठरावानुसार महापालिका आयुक्तांनी न्यायालयात अर्ज केला. 

पाचही नगरसेवक दोषी असल्याने अपात्र करण्यासोबतच दाव्याचा निर्णय लवकर लागावा म्हणून दररोज सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

घरकुल घोटाळा प्रकरणात भाजपचे विद्यमान नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी व लता भोईटे हे दोषी ठरले असून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  त्यानंतरही पाचही नगरसेवक सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत आहे. 

त्यामुळे गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव मंजूर करून ठरावाची आयुक्तांनी अंमलबजावणी करावी, असा निर्णय घेण्यात आला.