⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मनपा ब्रेकिंग : जळगावातील नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । शिवसेनेचे काद्दावर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बंड केले असून ३९ आमदारांसह ते मुंबई येथे येणार आहेत. या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. या घडामोडी संपूर्ण महाराष्ट्रात घडत असतानाच जळगाव शहर महानगरपालिकेतील काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी नगरसेवक चेतन सनकत, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख, ज्योती चौव्हाण, दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे तर हर्षल मावळे, कुंदन काळे आदी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून तब्बल ३९ आमदार फोडले असून गोहाटी येथे जाऊन बसले आहेत. त्यानंतर गोवा मार्गे महाराष्ट्रात येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच बंड किती मोठा आहे हे आता नागरिकांना सांगायची गरज नाही. कारण शिवसेनेच्या इतिहासातल हे सगळ्यात मोठ बंड आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातही एकही पक्षात इतक मोठ झाले नाही. इतके आमदार घेऊन कधीही कोणताही गेल नव्हता. आता याचे पडसाद संपूर्ण राज्यात पडू लागले असून जळगावातील नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे.

 शिवसेनेतून बंडखोरी करीत बाहेर पडलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. सुरुवातीला ११ असलेल्या आमदारांची संख्या आज ४५ वर येऊन ठेपली असून जवळपास १० खासदारांचा देखील पाठिंबा लाभत आहे. एकनाथ शिंदे गटाचे बळ वाढत असून संपूर्ण गट राज्यपालांना पत्र पाठवून स्वतंत्र गट स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना मुंबई, ठाणे, कल्याणच्या जवळपास ४०० नगरसेवकांचा पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात असून जळगावात एकनाथ शिंदेंच्या बळावर सत्तापालट केलेले आणि मूळ शिवसैनिक काय भूमिका घेणार हा प्रश्न जळगाव लाईव्हने विचारला होता. आता याचे उत्तर या नगरसेवकांनी दिले असून ६ नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे.

आम्ही आमचा पाठिंबा शिंदे यांना दर्शवला असून तेच जळगाव शहराचा विकास करतील असा आमचा विश्वास आहे.
चेतन सनकत , नगरसेवक, जळगाव