मुक्ताईनगर हादरले ! प्रेमसंबंधातून तरुणाचा निर्घणपणे खून

नोव्हेंबर 23, 2025 10:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२५ । मुक्ताईनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हॉटेल वृंदावन समोरील प्लॉटिंग भागात एका मोकळ्या जागेत विशाल गोसावी (वय २६, रा. मुक्ताईनगर) या तरुणाचा चाकू भोसकून निर्घणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

murder raver

ही हत्या प्रकरण प्रेमसंबंधातून घडले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशाल गोसावी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. आज रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्लॉटिंगच्या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरून हा खून असल्याचे स्पष्ट होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा किंवा सूडाचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, विशाल गोसावी याचे कोणासोबत प्रेमसंबंध होते आणि तो बेपत्ता झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता, याची कसून चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून, या गूढ खुनामागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now