मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ; नेमकं प्रकरण काय?

जुलै 22, 2025 2:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२५ । मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामागचं कारण म्हणले खामखेडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भूमी अधिग्रहणातील घोळाबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वातावरण चिघळले असून यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांसह आमदार पाटील यांना अटक केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Chandrakant patil

नेमकं प्रकरण काय ?

सध्या इंदूर ते हैदराबाद महामार्गाचे काम सुरू असून यात खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूव तर सदर कामाच्या ठेकेदाराने दादागिरी करत शेतकऱ्यांच्या केळीमध्ये जेसीबी घालून ते पीक जमीनदोस्त करत काम सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. याप्रसंगी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली होती. यानंतर देखील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. आज या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यानंतर वातावरण चिघळले. यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेऊन भुसावळ तालुका पोलीस स्थानकात आणले जात असल्याचे वृत्त आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now