१० हजाराची लाच स्वीकारताना महावितरणच्या महिला टेक्नीशियनला अटक

एप्रिल 12, 2021 7:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । मीटर कमर्शियल न करता घरगुतीच ठेवण्याकरिता महावितरण कंपनीच्या महिला टेक्निशीयन अधिकार्‍याला १० हजार रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे. शोभना दिलीप कहाने (वय-५६) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून या या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

shobhna kahane

तक्रारदार यांचे घरगुती मिटर कमर्शियल न करता व दंड न करण्यासाठी महावितरण कंपनीत सिनीयर टेक्नीशीयन शोभना कहाने यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार पोलीस उपअधिक्षक गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, अशोक अहिरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ , जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर आणि प्रदिप पोळ यांनी आज सापळा रचून शोभना कहाने यांना १० हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now