⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | नोकरी संधी | MPSC : पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मेगाभरती जाहीर

MPSC : पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मेगाभरती जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवीधर असाल आणि महाराष्ट्र राज्य शासनाची नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होईल; तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) पर्यंत आहे. या भरतीद्वारे एकूण 1333 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे .

ही पदे भरली जाणार :
1) उद्योग निरीक्षक – 39
2) कर सहायक – 482
3) तांत्रिक सहायक – 09
4) बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय – 17
5) लिपिक-टंकलेखक – 786

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

इतका पगार मिळेल :
उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय- ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
तांत्रिक सहायक, विमा संचालनालय : रुपये २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
कर सहायक : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
बेलिफ व लिपिक / लिपिक-टंकलेखक : १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी,18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
पूर्व परीक्षा: 02 फेब्रुवारी 2025

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.