---Advertisement---
शैक्षणिक नोकरी संधी

MPSC मार्फत मोठी पदभरती; तरुणांना सरकारी नोकरीची उत्तम संधी

---Advertisement---

MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अनेक तरुण तरुणी अहोरात्र अभ्यास करत असतात. तुम्हीही यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. एमएससीमार्फत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. वेगवेगळ्या विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा

mpsc jpg webp webp

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गट अ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याचसोबत मुख्य प्राध्यापक, मुखशल्यचिकित्साशास्त्र पदे तसेच विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

---Advertisement---

महाविद्यालयात डीन पदासाठी भरती
शासकीय महाविद्यालयात डीन गट अ पदांसाठी १० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. २१ मार्च ते १० एप्रिलपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला परीक्षा शुल्क १० एप्रिलपर्यंत भरायचे आहे.यामध्ये दिव्यांग, खेळाडू यांच्यासाठी आरक्षित जागा आहेत.
पात्रता : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना M.B.B.S किंवा मेडिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

सहयोगी प्राध्यापक
याचसोबत एमपीएससीद्वारे सहयोगी प्राध्यापक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.मुखशल्यचिकित्साशास्त्र पदासाठी ही भरती होणार आहे.या नोकरीसाठीही अर्ज करण्याची १० एप्रिल २०२५ शेवटची तारीख आहे.
पात्रता : या नोकरीसाठी डेंटल सर्जरीमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. किंवा डेंटल सर्जरीमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.

विविध विषयात सहयोगी प्राध्यापक- १६२ पदे
मायक्रोबायोलॉजी, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवेद्यक शास्त्र, शरीरक्रियाशास्त्र अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १६२ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी विविध पदांसाठी उमेदवारांनी त्या त्या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.
एमपीएससीमधील या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://mpsc.gov.in/adv_notification/8 या वेबसाइटववर माहिती दिलेली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment