पाडळसरेत नाटेश्वर महादेवाची यात्रा उद्या भरणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । सुर्यकन्या तापी, अनेर व बोरी नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी, दक्षिण तीरावर श्रीक्षेत्र पाडळसरे ग्रामस्थांचे आराध्य दैवत, पुरातन जागृत देवस्थान /”नाटेश्वर’ महादेवाचा यात्रोत्सव, माघ कृष्ण दशमी म्हणजेच शनिवारी (दि.२६) साजरा होणार आहे. या ठिकाणी पुर्वीपासून महादेवाला दाल बट्टीचा शाकाहारी नैवेद्य गावातील घराघरातून अर्पण केला जातो.

यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने पाडळसरे ग्रामपंचायतीकडून लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत शिवलिंग म्हणून द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रतीनाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर विलोभनीय असून काळ्या दगडांनी हेमांडपंथी बांधकाम आहे.

कोरीव आरेखन घुमटाच्या वर चार उपदिशांना वाघाच्या मूर्ती व त्यावर कळस आणि भागवत धर्माची पताका आहे. मंदिरात पाषाण शिळा त्यात लिंग हे संगमरवरी आहे. धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर चोपडा, शिरपूर व अमळनेर या तीन तालुक्यांच्या सीमेवर हे मंदिर आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
हे देखील वाचा :
- ‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या कायदेविषयक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
- पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; २७ सप्टेंबरला ‘गोदावरी करंडक भावगीत स्पर्धा आयोजित
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
- दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्कमाफी; अभाविपच्या मागणीला यश




