MPSC तर्फे विविध पदांच्या 1037 जागांसाठीची अधिसूचना जारी

डिसेंबर 28, 2022 12:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठीची भरती होणार असून यासाठीची जाहिरात (MPSC Recruitment 2023) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण १०३७ पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जानेवारी २०२३ आहे. MPSC Bharti 2023

mpsc jpg webp

या पदांची होणार भरती
१) उद्योग निरीक्षक गट-क / Inspector of Industries, Group-A ०६
२) दुय्यम निरीक्षक गट-क / Sub-Inspector Group-A ०९
३) कर सहाय्यक गट-क / Tax Assistant, Group-A ४८१
४) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क / Clerk-Typist (Marathi) Group-B ५१०
५) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क / Clerk-Typist (English) Group-B ३१

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उद्योग निरीक्षक गट-क –
०१) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा ०२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
दुय्यम निरीक्षक गट-क – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यक गट-क – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वेतन : १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now