नोकरी संधी

10वी पाससाठी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात मोठी भरती; 63,200 पगार मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीची शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 186 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. Nashik Mahanagarpalika Fireman Bharti 

NMC Nashik 1

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार महानगरपालिकेच्या nmc.gov.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2025 (11:55 PM) पर्यंत आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालवता भरतीसाठी त्वरित अर्ज करावा.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन)36
2फायरमन (अग्निशामक)150
Total186
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य. (iii) वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा.

वयाची अट : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन) -19,900/- ते 63,200/-
फायरमन (अग्निशामक) – 19,900/- ते 63,200/-

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button