⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आंदोलन : युवासेनेने रोखला महामार्ग, विद्यापीठासमोर ठिय्या!

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर युवासेनेचे सामूहिक गुणदानासह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनात करण्यात आले. यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनातर्फे १५ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

गेल्या अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनाला परीक्षेच्या संदर्भातील त्रुटी बद्दल निवेदन देऊन देखील कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नव्हती. प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे अनेक विद्यार्थ्यांनचे चुकीचे निकाल लागले, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. म्हणून सिनेट सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेने मार्फत सदर आंदोलन करण्यात आले.

यावेळी यावेळी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी अंकित कासार, उपमहानगर युवा अधिकारी यश सपकाळे,जय मेहता विभाग युवा अधिकारी अमोल मोरे, शिवसेनेचे अँड.अभिजित रंधे,यश सरोदे,सुदांशु चौधरी,अभिषेक सारस्वत,महेश अत्तरदे,वैष्णवी वाणी,मेघा नारखेडे,सुर्या लोखंडे,अश्विनी चौधरी व 200 अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते