रेल्वे स्टेशन जवळून मोटरसायकल लांबविली

एप्रिल 27, 2022 2:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । येथील रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत.

crime 12 jpg webp

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हिलाल इदवे (वय-४४) रा. त्रिभुवन कॉलनी, कानडदा रोड जळगाव हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. नोकरीसाठी ये-जा करण्यासाठी त्यांच्या कडे (एमएच १९ डीसी ८३४) क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी आहे. २३ एप्रिल रोजी ४.३० शिवाजीनगरातील रेल्वे पट्टाजवळ असलेल्या आरआरआय केबिन जवळ त्यांनी दुचाकी पार्क केली होती. ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. रवींद्र इदवे यांनी बदुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली. परंतु कुठेही मिळून आले नाही. यानंतर त्यांनी मंगळवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोना. प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now